S M L

..हा तर 'भाजप'मध्ये रक्तदोष !, सेना-अणे 'सामना' सुरूच

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2015 02:33 PM IST

..हा तर 'भाजप'मध्ये रक्तदोष !, सेना-अणे 'सामना' सुरूच

19 डिसेंबर : शिवसेना आणि श्रीहरी अणे यांच्या 'सामना' सुरूच आहे. आज पुन्हा शिवसेनेनं श्रीहरी अणे यांच्यावर टीका केलीये. श्रीहरी अणे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री आणि भाजपचे मंत्री ठामपण उभे आहेत याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अखंड महाराष्ट्राचे रक्त ज्यांच्या धमन्यांतून उसळत नाही. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? मुळात हा रक्तदोष आहे. अशी टीका 'सामना'तून करण्यात आलीये.

श्रीहरी अणेंची मुख्यमंत्री आणि भाजपने पाठराखण केली. याचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतलाय. महाराष्ट्र आहे म्हणून आजचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष वगैरे पदे आहेत. त्यामुळे शिवसेना याप्रश्नी आपला बाणा सोडणार नाही. भाजपने नेमलेले श्रीहरी अणे महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतात. मुख्यमंत्री म्हणतात, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. हे ऐकून मराठी जनता म्हणतेय, कमाल झाली. खरोखरच कमाल झाली. श्रीहरी अणे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर मंत्री ठामपणे उभे राहिले आहेत, याचे आश्चर्य वगैरे वाटण्याचे कारण नाही. हा रक्तदोष आहे. अखंड महाराष्ट्राचे रक्त ज्यांच्या धमन्यांतून उसळत नाही त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? ऍडव्होकेट जनरल पदावरील व्यक्तीने महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतली आणि हा घोर अपराध करूनही हे महाशय भाजपकृपेने पदास चिकटून आहेत अशी टीका करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2015 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close