S M L

लिमोझिन नव्हे स्कॉर्पिओ, गुजरातीबाबूचा 'कार'नामा

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2015 06:43 PM IST

लिमोझिन नव्हे स्कॉर्पिओ, गुजरातीबाबूचा 'कार'नामा

19 डिसेंबर : नवीमुंबई आरटीओच्या वायू वेग पथकाने बनावट विदेशी कंपनीच्या गाड्या पकडल्या असून सुप्रसिद्ध आणि महागड्या लिमोझिन गाड्यांची ही भ्रष्ट नक्कल करण्यात आली होती. श्रीमंत लोकांच्या लग्नसमारंभात सदर गाड्या प्रतीतास तीस ते चाळीस हजार रुपयांना दिल्या जात होत्या. दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

कारच्या दुनियेतील सर्वात आकर्षक आणि महागडी, श्रीमंतीचे प्रतिक ठरलेली लिमोझिन गाडी बाळगणे हे कारवेड्यांचे स्वप्न असते मात्र या गाड्यांची लांबी खूप असल्याने भारतीय रस्त्यात ती चालवणे हे दिव्यच आहे. मात्र या गाडीची क्रेझ ओळखून काही महाभागांनी स्कार्पिओ गाडी मोडीफाय करून ही गाडी बनवली. तब्बल साडे सहा मीटर लांबीची ही गाडी मुळ स्कार्पिओ गाडी असून त्याच्यात चेसीची लांबी वाढवून हुबेहूब लिमोझिन गाडी प्रमाणे त्याला लुक देण्यात आले होते.

अशा दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्या श्रीमंत लोकांच्या लग्नात आणि इतर श्रीमंती झळकावणार्‍या समारंभात भाडे तत्वावर देणे सुरू केले. ही गाडी प्रती तास पंचेवीस ते चाळीस हजार मोजले जात होते. श्रीमंताच्या लग्नाची शान बनलेल्या या गाड्या दिल्ली मुंबई सुरत आदी ठिकाणच्या श्रीमंताची शान आता पर्यंत या बनल्या होत्या. या बाबत अधिक माहिती देताना आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले की, या गाड्यां बाबत आम्हाला माहिती मिळाली होती. मात्र ठिकाणा माहित नव्हता. या दोन्ही स्कॉर्पिओ गुजरात पासिंग असून आम्ही जप्त केल्या आहेत.

गुजरात मधील वोरा नावाच्या वक्तीच्या ह्या दोन गाड्या आहेत GJ-07- BB-7666 आणि GJ-07-BB-8666 दोन्ही नव्या स्कार्पियो च्या गाड्या लिमोझिन करुन भाड्याने चालविल्या जात होत्या या गाड्या वाशी परिसरात आरटीओने पकडल्या मोटर वाहन कायद्या नुसार यावर कारवाई करुन दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2015 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close