S M L

वर्दीतली माणसं, पोलीस जीपमध्ये महिलेनं दिला बाळाला जन्म

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2015 07:25 PM IST

वर्दीतली माणसं, पोलीस जीपमध्ये महिलेनं दिला बाळाला जन्म

19 डिसेंबर : टीकेचं लक्ष्य ठरणार्‍या पुणे पोलिसांची सध्या प्रशंसा होते आहे. पुण्यात घोरपडीपेठ येथे थंडीत रात्री गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी एका गरोदर महिलेला प्रसूती करिता मदत केली. त्यामुळे खडकी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांची प्रशंसा होत आहे.

पोलिसांच्या जीपमध्ये या महिलेची प्रसूती झाली. या महिलेला आणि तिच्या बाळाला सुखरूप रुग्णालयात दाखल करता आलंय. अलका बालगुडे असं या प्रसुती झालेल्या महिलेचं नाव आहे. सध्या अल्का आणि तिच्या बाळावर कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अल्काला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. प्रसुतीवेदना होत असल्याने ती तिच्या आईसोबत शनिवारी पहाटे चार वाजता बस स्थानकावर आली. मात्र तिथे तिच्या मदतीकरिता कुणीही नव्हतं. सुदैवाने रात्री गस्तीवर कार्यरत असणार्‍या पोलिसांनी अल्काच्या प्रसुती वेदना ऐकल्या आणि तिला मदत केली अल्काला स्वता:च्या सरकारी पोलीस गाडीत रुग्णालयात सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयात जात असतानाच अल्काने बाळाला जीप मध्येच जन्म दिला. पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीला समाजाच्या सर्व स्तरातून सलाम करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2015 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close