S M L

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांना वाढती मागणी

- सागर शिंदे18 फेब्रुवारी पुण्यामध्ये झालेल्या जर्मन बेकरीमधल्या स्फोटात अनेक निष्पापांचा बळी गेला. आता या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरा विक्रेत्यांकडे आणि सिक्युरिटी एजन्सीजकडे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मागणी वाढली आहे. पुण्यातील सगळ्या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी हॉटेलच्या शेड्समध्येही हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. जर्मन बेकरीत सीसीटीव्ही कॅमेराच नसल्याने स्फोटाच्या तपासात पोलिसांसमोर अडचणी येत आहे. हे लक्षात घेऊन हॉटेल मालकांनी हा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2010 10:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2010 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close