S M L

मालाड-मालवणीतील 3 तरुण आयसिसमध्ये सामिल ?

Sachin Salve | Updated On: Dec 21, 2015 12:46 PM IST

मालाड-मालवणीतील 3 तरुण आयसिसमध्ये सामिल ?

21 डिसेंबर : पुण्यातील एक अल्पवयीन मुलगी आयसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यापासून रोखण्यात एटीएसला यश आलं असल्याची घटना समोर येऊन काही दिवस उलटले नाही तेच आता राजधानी मुंबईतील 3 तरुण आयसिसमध्ये सामिल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मालाड-मालवणीतून तीन तरुण दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. हे बेपत्ता तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय बळावलाय.

मोहसिन शेख, अयाज सुलतान आणि वाजिद शेख असं या तीन तरुणांची नावं आहेत. एटीएस या तीनही तरुणांचा शोध घेत आहे. या तिघांचे फोटो एटीएसने जारी केले आहे. वेगवेगळी कारणं सांगून तिघांनीही घरं सोडलं होतं. मोहसिन हा रिक्षाचालक असून याआधीही त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. आपण लग्नाला जात असल्याचं सांगून तो घरातून बाहेर पडला. मोहसिन हा कट्टर विचारांचा असून इस्लामसाठी काही तरी करण्याची त्याची तीव्र इच्छा होती.

तर अयाजचं शिक्षण दुसर्‍या वर्षापर्यंत झालंय. तो मालाडमध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. आई,बहिण आणि भावासोबत तो राहत होता. त्याच्या कुटुंबात तो एकटा कमावला होता.

वाजिद हा पदवीधर तरुण आहे. त्याचं दहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं. घरीच घाऊक लिंबाचा व्यवयाय आहे तो त्यालाच हातभार लावत होता. 16 डिसेंबर रोजी आधार कार्डचं काम सांगून तो बेपत्ता झाला. हे तिन्ही तरुण एकमेकांच्या घराशेजारीच राहतात. या तिघांनाही परदेशात नोकरीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी प्रयत्न सुरू होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. पण ते आयसिसमध्ये सहभागी होतील याबद्दल आम्हाला कल्पना नव्हती असंही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. एटीएसने केंद्रीय पथकाची मदत घेत आहे. अयाज हा देशाबाहेर पडल्याची दाट शक्यता आहे तर इतर दोघांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2015 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close