S M L

मध्य रेल्वेवर उद्यापासून धावणार 2 आसनांची लोकल

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2015 10:56 PM IST

मध्य रेल्वेवर उद्यापासून धावणार 2 आसनांची लोकल

 

21 डिसेंबर : गर्दीच्या वेळी धावत्या लोकलमधून प्रवासी पडून मृत्युमुखी होण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे उद्या, मंगळवारपासून दोन आसनी रांगांची लोकल चालवणार आहे. लोकलमधून प्रवासादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेच्या 5 डब्यांमध्ये बदल करण्यात आलं आहेत.  यात लोकलमधल्या चार डब्यांमधील दरवाज्याच्या बाजूच्या सीट्स काढल्या आहेत. तर एका डब्यात मेट्रोच्या सीट सारख्या आडव्या सीट्स बसवण्यात आल्या आहेत.

सकाळ आणि संध्याकाळच्यावेळी लोकलला मोठयाप्रमाणात गर्दी असते आणि यावेळी रेल्वेतून पडून मृत्यु होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. मध्य रेल्वेमार्गावर दोन आसनी रांगाची लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने याअगोदरही घेतला होता परंतु प्रवाशांच्या वाढत्या विरोधामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला होता. वाढत्या प्रवासी मृत्युच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रायोगिक तत्वावर ही लोकल उद्यापासून सुरू करत आहे. त्यामुळे या नव्या लोकलला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2015 09:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close