S M L

मुंबईची लाईफलाईनच,धावत्या लोकलमध्ये महिलेनं दिला बाळाचा जन्म

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2015 08:44 AM IST

मुंबईची लाईफलाईनच,धावत्या लोकलमध्ये महिलेनं दिला बाळाचा जन्म

22 डिसेंबर : मुंबईची लोकल ट्रेन...मुंबईकरांची लाईफलाईन...मुंबईकरांना आपल्या वेगात सामावून घेणारी ही लोकल ट्रेन काल ठरली बर्थ ट्रेन..मुंबईत धावत्या लोकल ट्रेन मध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. ही घटना काल रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान कुर्ला स्टेशनवर घडली. बाळ आणि बालाची आई सुखरुप असून दोघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वेळ रात्री साडे नऊची...काल गरीमा सिंग नऊ महिन्यांची गरोदर...याच वेळी दिवा स्टेशनहून सीएसटी कामा रुग्णालयात तपासणीकरता निघाली...सगळं काही व्यवस्थीत असतांनाच..गरीमाला घाटकोपर स्टेशन सोडल्यानंतर प्रसव वेदना सुरू झाल्या आणि थोड्यावेळातच कुर्ला ते विद्याविहार स्टेशन दरम्यान गरीमाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यावेळी महिला डब्यातील प्रवाश्यांनी गरीमाला धीर देत पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. या कॉल नंतर कुर्ला स्थानकावर रेल्वे पोलीस डॉक्टरांच्या पथकाला घेऊन सज्ज होतेच. ट्रेन आल्यानंतर लगेचच आई आणि बाळाची तपासणी करुन दोघांनाही पुढील उपचाराकरता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2015 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close