S M L

कांदिवली दुहेरी हत्याकांड प्रकरणी चिंतन उपाध्यायला अटक

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2015 10:29 AM IST

कांदिवली दुहेरी हत्याकांड प्रकरणी चिंतन उपाध्यायला अटक

22 डिसेंबर : कांदिवली दुहेरी हत्याकांड प्रकरणी हेमा उपाध्यायचा पती चिंतन उपाध्यायला अटक करण्यात आलीय. सोमवारी रात्री त्याची चौकशी झाली. पोलिसांना या प्रकरणात काही नवे धागेदोरे सापडलेत, त्याबद्दल चिंतनची चौकशी करणं गरजेचं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

सोमवार रात्रीपासून चिंतन उपाध्यायची चौकशी सुरू होती. त्याच्या जबाबात पोलिसांना अनियमितता आढळली. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळी त्याला अटक केली.

हेमा उपाध्याय आणि चिंतन यांच्यामध्ये 2010 पासून घटस्फोटावरुन वाद सुरू होता. या प्रकरणात आरोपी साधू राजभर 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. तर मुख्य आरोपी विद्याधर राजभर अजूनही फरार आहे. हेमा आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांची हत्या झाली होती. 11 डिसेंबर रोजी त्यांचे मृतदेह कांदिवलीमध्ये बॉक्समध्ये आढळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2015 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close