S M L

निषेध म्हणून कार्यालयात कुत्र्यांची पिल्लं सोडली

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2015 01:32 PM IST

निषेध म्हणून कार्यालयात कुत्र्यांची पिल्लं सोडली

22 डिसेंबर : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेल्या 6 महिन्यांपासून केली जातेय. मात्र, त्याकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलंय. अखेर सांगली जिल्हा सुधार समितीनं सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मोकाट कुत्री सोडली. हे आंदोलन झालं तेव्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे ऑफिसात हजर नव्हते. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी त्यांच्या खुर्ची आणि टेबलावर कुत्र्यांना बसवलं.

सांगली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज मोकाट कुत्री महापालिकेच्या आरोग्य विभागाला भेट देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी हे ऑफिसमध्ये हजर नव्हते. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी ही कुत्री महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्याखुर्ची आणि टेबलावर बसवण्यात आली. सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. वारंवार तक्रार करुण ही मोकाट कुत्र्यांचा महापालिका आरोग्य विभाग बंदोबस्त करत नसल्यामुळे हे आंदोलन केले.

लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी करण्याच्या घटना घडत आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ही मागणी गेल्या सहा महिन्यापासून नागरिकांकडून आणि सांगली जिल्हा सुधार समिती यांच्या कडून होत आहे. परंतू मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका ही दिरंगाई करत आहे. त्यामुळे आज सांगली जिल्हा सुधार समितीने अनोखं आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2015 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close