S M L

पारधी समाजासाठी घरे आणि शाळा

18 फेब्रुवारी राज्यातील पारधी समाजाला घरे देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने केली आहे.माढा पारधी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे. राज्यात एकूण 1 लाख 20 हजार पारधी आहेत. पारध्यांच्या मुलांसाठी विशेष शाळाही सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील पहिली शाळा माढा इथेच स्थापन होणार आहे. त्यानंतर सोलापूर आणि राज्यात सर्वत्र या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. फासेफारधी समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यसरकारने हे पाऊल उचलले आहे. आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा आराखडा तयार केला आहे. माढा येथे पारधी हत्याकांडाच्या निमित्ताने कृषीमंत्री शरद पवार यांनी दौरा केला होता. त्यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील फासेपारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी चांगले काम करत आहेत. राज्य सरकारने त्यांच्याच कामाला बळ द्यावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार आता राज्य सरकार फासेपारधी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार आहे. पारधी समाजाच्या तरुणांनी गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून जिल्हाधिकारी पाटील यांनी सोलापुरात त्यांच्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण सुरू केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2010 01:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2010 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close