S M L

साखरेची ऑर्डर बंद कारखान्यांना!

18 फेब्रुवारी आडातच नाही तिथे पोहर्‍यात कसे येणार? ही म्हण सगळीकडे परिचित आहे. पण या म्हणीचा अर्थ अजून औरंगाबादमधील पुरवठा विभागाला समजलेला दिसत नाही. कारण त्यांनी स्वस्त धान्याच्या दुकानांसाठी साखरेची मागणी केली आहे. पण ती चक्क बंद साखर कारखान्यांकडे! त्यामुळे साहजिकच औरंगाबादच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये सध्या साखरच मिळत नाही. साखर झाली खराब!उदाहरण द्यायचे झाले तर गंगापूर आणि सिद्धेश्वर साखर कारखान्यांकडे साखर नसतानाही त्यांना सरकारी कोट्याची ऑर्डर देण्यात आली. आता कारखानेही पुरवठा विभागाच्या वरताण आहेत. त्यांनी चक्क साखर खराब झाल्याचे सांगत पुरवठा विभागाची वाहने परत पाठविली...कारवाई नाहीविशेष म्हणजे बंद कारखान्यांना ऑर्डर देण्याची पुरवठा विभागाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार झाले आहेत.ऑर्डर देऊन सहा महिने उलटले तरीही साखर कारखान्यांनी स्वस्त धान्य दुकानांना साखरेचा पुरवठा केलेला नाही. आणि पुरवठा विभागाने यावर काहीही कारवाई केलेली नाही. मागणी अपुरीचफेब्रुवारी महिन्यात दारिद्र्यरेषेच्या वरील ग्राहकांसाठी 6 हजार क्विंटल साखरेची मागणी नोंदवली गेली होती. पण त्यापैकी फक्त 2 हजार क्विंटलचीच मागणी पूर्ण झाली. तर दारिद्ररेषेखालील ग्राहकांसाठी 5 हजार 813 क्विटंल साखरेचा कोटा मंजूर झाला होता. त्यापैकी फक्त 810 क्विंटल साखरेचाच पुरवठा करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2010 02:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2010 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close