S M L

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच विधानपरिषदेचं कामकाज तहकूब

Samruddha Bhambure | Updated On: Dec 23, 2015 02:34 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच विधानपरिषदेचं कामकाज तहकूब

23 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आजही सभागृहात गोंधळाचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकर्‍यांसाठी संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच तालिका सभापतींनी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. यामुळे भाजप नेत्यांनी तालिका सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी दर्शवली आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झाले. शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केल्याशिवाय कामकाज चालू न देण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. शेतकर्‍यांना मदतीवरील चर्चेला उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस उभे राहिल्यावर विरोधकांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सरकारविरोधात यावेळी घोषणा देण्यात येत होत्या. अशात स्थितीत देवेंद्र फडवणीस सरकारची बाजू मांडत होते. पण विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज बुधवारी सकाळी तीन ते चार वेळा तहकूब करावं लागलं. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करण्यात आल्यामुळे सत्ताधार्‍यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी घडल्या प्रकाराबद्दल स्वत:हून दिलगिरी व्यक्त केली. घोषणा देणं हा विरोधकांचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करायला नको हवं होतं, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2015 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close