S M L

फिल्मी कॉलर ट्यून-रिंगटोन वाजवू नका, विश्वास नांगरे पाटलांची पोलिसांना सुचना

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2015 06:29 PM IST

फिल्मी कॉलर ट्यून-रिंगटोन वाजवू नका, विश्वास नांगरे पाटलांची पोलिसांना सुचना

23 डिसेंबर : कॉलर ट्यून आणि रिंगटोन कुणी काय ठेवलं असेल, याचा काही नेम नाही. पण औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. तसं एक परिपत्रकच त्यांनी काढलं आहे. सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी ह्याच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं पोलिसांना सांगण्यात आलंय. असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो.. जनता पोलिसांवर हसते, असं नांगरे पाटलांचं म्हणणं आहे.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपल्या मोबाईलची रिंगटोन आणि कॉलर ट्यून ठेवण्याबाबत परिपत्रक जाहीर केलंय. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या

मोबाईलच्या रिंगटोन आणि कॉलर ट्यून निरनिराळ्या सिनेमांच्या मालिकांच्या अथवा पक्षांच्या गाण्यांच्या ठेवल्याचं निदर्शनास आलंय.

पोलिसांच्या प्रतिमेला त्यामुळे तडा जात असल्याचं निदर्शनास आल्यामुळे अशा पद्धतीच्या रिंगटोन्स अथवा कॉलर ट्यून्स त्वरीत

बदलण्यात याव्यात असे आदेश या परिपत्रकातून देण्यात आले आहे. राजशिष्टाचाराच्या अनुषंगाने याबाबत सर्व वरिष्ठांनी आपल्या कनिष्ठांना याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात देऊन कारवाई करावी असंही या पत्रकात नमूद करण्यात आलंय. औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड ,परभणी, लातूर, हिंगोली या परिक्षेत्रातील पोलिसांना हे पत्रक लागू करण्यात आलंय. मात्र, या पत्रकाबद्दल

पोलिस कर्मचार्‍यांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2015 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close