S M L

मुंबईत परळ स्टेशनवर महिला पत्रकाराचा विनयभंग

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2015 10:04 PM IST

BOMBARDIER LOCAL23 डिसेंबर : मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर महिलांशी असभ्य वर्तन करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज (बुधवारी) एका अंध मुलीची छेड काढण्यात आली तर सोमवारी एका महिला टीव्ही पत्रकाराची छेड काढण्याची घटना घडलीये.

आपलं काम संपवून सोमवारी घरी परतत असताना रात्री सव्वा आठ वाजता परेल स्टेशनला सांतिया डुडी ही महिला पत्रकार पोहोचली. त्याचवेळी एक तरुण तिच्याजवळ आला आणि त्यानं तिच्याशी असभ्य वर्तन केलं. तिनं जेव्हा त्याला पकडलं तेव्हा मात्र त्यानं केलेल्या कृत्याची त्याला लाजही वाटत नव्हती असं दिसलं. लोकांना आरडाओरड करुन सांतियानं त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो निसटला.

संतापजनक बाब म्हणजे तिथे रेल्वे पोलीस उपस्थितही नव्हता. सांतियानं जीआरपी कमिश्नर मधुकर पांडे यांना फोनही केला. पण फोनला साधं उत्तरही न मिळाल्यानं सांतिया घरी गेली. पण घरी जात असताना तिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या घटनेचा मेसेज केला आहे. त्यानंतर अजूनही पोलिसांनी त्या तरुणाला पकडलं नाही.

रेल्वे पोलीस खरंच काम करतायत का ? आरपीएफ आणि जीआरपीचे पोलीस जर स्टेशनवर त्या दिवशी असते तर हा तरुण त्यावेळीच पकडला गेला असता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेने प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2015 10:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close