S M L

मुत्तेमवारांकडून घरचा आहेर

19 फेब्रुवारीमुख्यमंत्री अशोक चव्हाणांना खासदार विलास मुत्तेमवारांनी घरचा आहेर दिला आहे. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर विलास मुत्तेमवार यांनी सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाणांनी मंत्रिपदाचे वाटप करताना अन्याय केल्याची टीका मुत्तेमवारांनी केली आहे. 'पतंगराव अस्वलासारखे फिरतात'पतंगराव कदमांना वनमंत्री केले. पण त्यांना जंगलातले काय कळते? ते अस्वलासारखे जंगलात फिरतात..!अशी टीका खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली आहे.नितीन राऊतांना काय कळते?ज्या नितीन राऊतांना पशुसंवर्धनातले काहीही कळत नाही त्यांना पशुसंवर्धन खाते दिले. तर शिवाजीराव मोघे यांची सामाजिक न्याय मंत्रालय देऊन बोळवण केली, असेही मुत्तेमवार म्हणाले आहेत. मी अस्वल नव्हे सिंह!मुत्तेमवार यांच्या या टीकेला उत्तर देताना पतंगराव कदम म्हणाले, 'मी जंगलात वाघासारखा फिरतो आणि सिंहासारखे काम करतो. माझ्या मंत्रिपदाच्या 3 महिन्यांतच राज्याला वनांचे अस्तित्व जाणवले. शिवाय माझ्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत मी सिंहासारखे काम केले आहे. माझे मुत्तेमवारांना आवाहन आहे, की 25 तारखेला माझी नागपूरला बैठक आहे. त्यावेळी येऊन माझ्या कामाची माहिती घ्यावी'. विदर्भाकडे दुर्लक्ष नाहीतर 'मुत्तेमवार यांची टीका चुकीची आहे. शिवाजीराव मोघे यांच्या सामाजिक न्याय खात्याचा खरा उपयोग विदर्भालाच अधिक होणार आहे. कारण विदर्भात दलितांची संख्या मोठी आहे. दलित, मागासांसाठीच्या योजना आश्रमशाळा, विदर्भातच जास्त आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विदर्भाकडे दुर्लक्ष झालेले नाही, हे मुत्तेमवारांनी लक्षात घ्यावे', असे काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2010 10:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2010 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close