S M L

विनय नातू भाजपमध्ये परतणार

19 फेब्रुवारीभाजपचे बंडखोर नेते विनय नातू यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली आहे. यामुळे नातू पुन्हा भाजपमध्ये परतण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची 21 तारखेला रत्नागिरीत सभा होणार आहे. यावेळी नातू आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत नातूंनी शिवसेनेचे रामदास कदम यांच्या विरोधात गुहागरमधून बंडखोरी केली होती. श्रीधर सेना हा नवा पक्ष स्थापून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना तिसर्‍या क्रमांकाची 29 हजार 441 मते मिळाली होती.गुहागरच्या जागावाटपाच्या तिढ्यातून युतीत मोठा तणाव निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या वाट्यालाही जागा गेली होती. पण नातूंच्या बंडखोरीमुळे तिथे राष्ट्रवादीला सहज विजय मिळाला होता. विनय नातू यांचे वडील श्रीधर नातू जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी गुहागर हा भाजपचा बालेकिल्ला बनवला होता. विनय नातूही गडकरींच्या जवळचे मानले जातात.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2010 10:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2010 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close