S M L

अरुण जेटली असलं गलिच्छ काम करणार नाहीत, पवारांनी केली जेटलींची पाठराखण

Samruddha Bhambure | Updated On: Dec 24, 2015 06:04 PM IST

sharad pawar 21

24 डिसेंबर : डीडीसीएमध्ये घोळ निर्माण झाला आहे. मात्र, त्यात काही व्यक्तींचा सहभाग असताना एकट्या अरूण जेटलींना जबाबदार धरणे चुकीचे आहे. जेटलींकडून गलिच्छ काम होणे शक्य नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेटलींची पाठराखण केली.

सीबीआययने दिल्ली सचिवालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर केजरीवालांकडून जेटलींवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून केजरीवालांनी जेटलींना घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्यावरून भाजपाचे खासदार कीर्ती आझाद यांनीही जेटलींवर निशाणा साधला. त्यानंतर जेटलींच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. स्वपक्षीय नेत्यावर आरोप केल्याने आझाद यांच्यावर भाजपाने निलंबनाची कारवाई केली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेत जेटलींची पाठराखण केली. दिल्ली क्रिकेट संघटनेत घोळ निर्माण झाला आहे. मात्र, त्यात एकटया अरूण जेटलींना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचं म्हणत पवार यांनी जेटलींना 'क्लिन चीट' दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2015 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close