S M L

मुंबईकर आणखी कुडकुडणार, पारा अजून घसरणार

Sachin Salve | Updated On: Dec 25, 2015 09:15 AM IST

मुंबईकर आणखी कुडकुडणार, पारा अजून घसरणार

25 डिसेंबर : राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे पण गेल्या अनेक दशकानंतर मुंबईतही चांगलीच हुडहुडी भरलीये. आता मुंबईकर आणखी कुडकुडणार आहेत. कारण मुंबईतली तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या दशकभरातल्या सगळ्यांत जास्त थंडीचा अनुभव मुंबईकर सध्या घेत आहे. पण पहिल्यांदाच वेधशाळेकडून थंडीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी मुंबईतलं तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. गुरुवारी रात्रीही मुंबईसह उत्तर कोकणासाठी वेधशाळेनं थंडीचा इशारा दिला होता. किनार्‍यावर असल्यानं समुद्राच्या असल्यानं समुद्राच्या दमट वार्‍याचा मुंबईच्या हवामानावर प्रभाव पडतो. त्यामुळे राज्यात थंडी पसरली तरी मुंबईत तुलनेनं उबदार वातावरण असतं. यावेळी मात्र अगदी महाबळेश्वरसारख्या ठिकाणी तापमान जास्त होतं.पण मुंबईत थंडी होती. यापूर्वी उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. पण पहिल्यांदाच थंडीचा इशारा देण्यात आलाय.

मुंबईत हुडहुडी (तापमान अंश सेलियसमध्ये)

20 डिसें.        17.8

21 डिसें.        16

22 डिसें.      13.4

23 डिसें.        11.6

24 डिसें.        11.4

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2015 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close