S M L

शिळ्या कढीला ऊत कशाला ?,राम मंदिरावरुन सेनेनं भाजपला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Dec 25, 2015 09:55 AM IST

शिळ्या कढीला ऊत कशाला ?,राम मंदिरावरुन सेनेनं भाजपला फटकारलं

25 डिसेंबर : राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फटकारलंय. राम मंदिर उभारण्यासाठी पुन्हा शिळा आणण्यात आल्या असल्या तरीही गेल्या 20-25 वर्षांत आलेल्या शिळांचे काय झाले असा सवाल या अग्रलेखातून विचारण्यात आलाय.

हजारोंची बलिदाने होऊनही भारत पाकिस्तानात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होते तर मग ज्या कारसेवकांच्या रक्ताने शरयु नदी लाल झाली त्या रक्ताचे मोल ठेवून खेळीमेळीच्या वातावरणात राममंदिराची निर्मिती का होऊ नये असा सवाल विचारण्यात आलाय.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून ठेवीले 'अनंते तैसेची रहावे' अशी परिस्थिती जनतेवर आलीये तशीच परिस्थिती प्रभू रामचंद्रावरही आली आहे. जे न्यायालय गरिबांना झोपडी, बलात्कारीत स्त्रीला न्याय आणि जनतेला सुरक्षा देऊ शकले नाही ते प्रभू रामचंद्राला हक्काचे राम मंदिररूपी घर देईल का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.

सणांच्या साजरीकरणापासून सगळ्याच गोष्टीत न्यायालय हस्तक्षेप करतंय मात्र आयोध्येबाबत निर्णय घेतला जात नाही. 2017 साली उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून त्यानुसार राममंदिर निर्माणाच्या चर्चेचा प्रसाद वाटण्याचे काम सुरू झाले अशीही टीका करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2015 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close