S M L

कदम हे अवघड जागेचं दुखणं, सेनाशाखेबाहेरच 'फलक'वॉर

Sachin Salve | Updated On: Dec 25, 2015 11:30 AM IST

कदम हे अवघड जागेचं दुखणं, सेनाशाखेबाहेरच 'फलक'वॉर

25 डिसेंबर : विधान परषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना राजकारण आता तापू लागलंय. पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांच्याबद्दल एक फलक लावून त्यांना शालजोडीतून हाणण्यात आलंय. कदम हे अवघड जागेचं दुखणं आहे. त्यांच्या सारख्या सर्वांचे प्लानिंग करणारा पक्षप्रमुखांचा स्वीय सहाय्यक सर्वांना लाभू दे अशी सडकून टीका यात करण्यात आलीये. विशेष म्हणजे माहिमच्या शिवसेना शाखा क्रमांक 183 मध्ये हा फलक लागलाय.

रामदास भाई निवडून येतील आणि आता पुन्हा एकदा आपल्याला त्यांची रटाळ भाषणे आणि शिव्या ऐकाव्या लागतील. कदमांनी पक्षाकडून सर्व फायदे घेतले आतातरी ते त्यांच्या खेडमधल्या हॉटेल किंवा हॉस्पिटलला बाळासाहेबांचे नाव देतील का असा सवालही त्यातून विचारण्यात आलाय. कदम हे अवघड जागेचं दुखणं आहे. त्यांच्या सारख्या सर्वांचे प्लानिंग करणारा पक्षप्रमुखांचा स्वीय सहाय्यक सर्वांना लाभू दे अशी असंही त्या फलकात लिहिण्यात आलंय. रामदास कदम यांच्या पक्षातील विरोधकांनी हा फलक लावल्याची चर्चा आहे.

काय लिहिलंय या फलकात ?

रामदास कदम यांना विधानपरिषदेच्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा

आता यापुढेसुद्धा डॅशिंग वक्ते म्हणून रामदासभाईंची तीच रटाळ भाषणे कोबंडीचोर वगैरे, वगैरे आम्हाला ऐकायला मिळणार. शिवसेना प्रमुखांमुळे नावारुपाला आलेल पण पालखी या आलिशान निवास्थानी चांदीच्या सिंहासनावर बसून आलेल्या याचकांवर पाळलेली कुत्री सोडणारे रत्नागिरी खेड येथिल स्वत:च्या मालकीच्या प्रचंड मोठ्या योगिता डेंटल हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डला अथवा पेशंटच्या बेडला शिवसेनाप्रमुखांचे नाव देणार का ? पर्यावरण मंत्री व पालक मंत्री म्हणून आपल्या विभागाला वेळ देणार का व शिवसैनिकांपासून पुढे सर्वांना शिव्यांच्या वापद बंद होणार का ? तरच आम्ही आपणांस मतदान करू. आपल्यासारख्या अवघड जागेचे दुखणे असणार्‍या अनेकांचे प्लॅनिंग करून रक्षण करणारा तो पक्ष प्रमुखांचा स्वीय सहाय्यक सर्वांना लाभू देत ही देवा पुढे प्रार्थना. असो आपण खासगीत सांगता आपल्याकडेसुद्धा राहुल गांधी आहेत ते कोण एकदा जाहीर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2015 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close