S M L

ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Dec 25, 2015 01:50 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन

sadhnaranbir-46025 डिसेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतलं निखळ सौंदर्याचं प्रतीक अशी ओळख असणार्‍या अभिनेत्री साधना यांचं आज (शुक्रवारी) सकाळी मुंबईत निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्या हिंदुजा रुग्णालयात भरती होत्या. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

साधना शिवदसानी यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीमध्ये झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. त्यानंतर

लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटात कामं करायला सुरुवात केली.

'मेरा साया', 'मेरे मेहबूब', 'हम दोनो', 'वक्त', 'आरजू', 'राजकुमार', 'लव इन सिमला' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्यांचा 'साधना कट' ही केसांची विशेष स्टाईल त्या काळी खूप प्रसिद्ध झाली होती.

'मुड मुड के ना देख मुड मुड के' या गाण्यात त्या बॅकग्राऊंड डान्सर मध्ये होत्या. त्यांचं सौंदर्य आणि नैसर्गिक अभिनयानं त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2015 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close