S M L

ज्येष्ठ अभिनेत्री साधनांना अखेरचा निरोप

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2015 01:52 PM IST

 ज्येष्ठ अभिनेत्री साधनांना अखेरचा निरोप

26 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासनी यांचं शुक्रवारी मुंबईत वयाच्या 74 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. आज सकाळी सांताक्रूझच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साधना यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हिंदी फिल्म सृष्टीतील दिग्गज इथे उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेत्री हेलन त्यांचे पती सलीम खान, वहिदा रेहमान हे ही यावेळी उपस्थित होते. साधना यांनी त्यांचे अखेरचे दिवस भाजप नेत्या शायना एनसी यांच्या घरातही घालवले होते. शायना यांनीच पुढाकार घेऊन साधना यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आपल्या कारकिर्दीत अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.

बॉलिवूडमध्ये सत्तरच्या दशकात गाजलेली अनेक गाणी ही साधना यांच्यावर चित्रीत झाली होती. त्यांच्या अदाकारीची मोहिनी कायम रसिकप्रेक्षकांच्या मनात जीवंत राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2015 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close