S M L

राज ठाकरेंचा पुढाकार, लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाणी पुस्तकस्वरुपात

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2015 02:28 PM IST

राज ठाकरेंचा पुढाकार, लतादीदींच्या हस्ताक्षरातील गाणी पुस्तकस्वरुपात

26 डिसेंबर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचा त्यांच्याच हस्ताक्षरातील अमुल्य ठेवा जवळ ठेवण्याची संधी आता रसिकांना मिळणार आहे. कारण, त्यांच्या गाण्यांचं एक आगळं वेगळं पुस्तक सध्या आकाराला येतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दीदींच्या भाची रचना शाह आणि पत्रकार अंबरिश मिश्र यांनी या कामासाठी पुढाकार घेतलाय.

लतादीदींना कायम आपण गात असलेली गाणी जाडसर कागदावर लिहून घेऊन गाण्यापूर्वी त्यावर ठरावीक खुणा करायची सवय होती. अशी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली अनेक गाणी दिदींच्या संग्रहात आहेत. हिच गाणी मूळ स्वरुपात वाचकांना वाचता यावीत यासाठी ती

जशीच्या तशी पुस्तकस्वरूपात आणण्याचा निर्णय या सगळ्यांनी घेतलाय. लतादीदींच्या सदाबहार गाण्यांपैकी तीनशे गाणी गाणी या पुस्तकासाठी निवडण्यात आली आहे. गाण्याप्रमाणेच या पुस्तकात दीदींच्या दुर्मिळ छायाचित्रांचा अंतर्भावही असेल. येत्या फेब्रुवारी महिन्यात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2015 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close