S M L

विधान परिषदेच्या 7 जागांसाठी झालं मतदान, 30 तारखेला लागणार निकाल

Samruddha Bhambure | Updated On: Dec 27, 2015 09:30 PM IST

vidhan bhavan3

27 डिसेंबर : राज्यात विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदानाची वेळ संपली आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोण बाजी मारणार हे येत्या बुधवारी म्हणजे 30 डिसेंबरला सामोरं येईल. निवडणूकीसाठी आज झालेल्या मतदानात मुंबईमध्ये 87 टक्के तर कोल्हापूरमध्ये 100 टक्के मतदान झालं.

 

मुंबई - 87 टक्के मतदान

मुंबईतील दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. मुंबईत एकूण मतदार नगरसेवकांची संख्या 229 आहे. 229 नगरसेवकांपैकी 201 नगरसेवकांनी मतदान केलं तर मनसेच्या 29 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. आता 30 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. एका नगरसेवकांचा मृत्यू झाला आणि एक नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्यानं उरलेल्या 230 नगरसेवकांपैकी 201 जणांनी मतदान केलं. जिंकण्यासाठी उमेदवाराला 67 ची मॅजिक फिगर गाठावी लागेल.

कोल्हापूर 100 टक्के मतदान

कोल्हापूरमध्ये एकूण 12 ठिकाणी मतदान झालं. या निवडणुकीसाठी 382 मतदारांनी मतदान केलं. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात विद्यामान आमदार महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे यावेळची निवडणूकही कोल्हापूरमध्ये पाटील विरुद्ध महाडिक याच पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पहायला मिळतं आहे. आजच्या मतदानामुळे जिल्ह्यातल्या संवेदनशील भागामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, कोल्हापूरच्या या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचीही चर्चा जिल्हात आहे.

अकोला - 99 टक्के मतदान

791 पैकी 786 डणांनी मतदान केलं.शिवसेना-भाजप युतीकडून गोपीकिशन बजोरीया आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून रवींद्र सपकाळ रिंगणात आहेत.

अहमदनगर - 98 टक्के मतदान

अहमदनगर जिल्ह्यात 427 मतदारांपैकी 426 जणांनी मतदान केलं. अहमदनगरमध्येआघाडीचे उमेदवार आमदार अरुण जगताप आणि युतीचे शशिकांत गाडे यांच्यात दुरंगी लढत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आणि मच्छींद्र सुपेकर यांच्या पाठिंब्यानं जगताप यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आघाडीच्या नाराज मतदारांवर डोळा ठेऊन युतीनंही मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळं निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यामुळं राष्ट्रवादीचे जगताप आमदारकी कायम राखतात का गाडे आमदारकी मिळवतात, याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे.

धुळे-नंदूरबार - 98 टक्के मतदान

विधान परिषदेच्या धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं मतदान शांततेत पार पडलं. याठिकाणी 98 टक्के मतदान झालं. कॉग्रेसकडून अमरीष पटेल तर भाजपाकडून डॉ शशिकांत वाणी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात कॉग्रेसच्या मतदारांच प्राबल्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2015 07:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close