S M L

...तर तपास एनआयएकडे

20 फेब्रुवारीपुणे बॉम्बस्फोटाचा तपास एका आठवड्यात लागला नाही, तर हा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे बॉम्बस्फोटाला एक आठवडा पूर्ण होत आहे. अजूनही तपास कार्याला हवे तेवढे यश मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारणार्‍या इंडियन मुजाहिदीनवर बंदी घालण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.मृतांची संख्या 12पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या बळींची संख्या आता 12 वर पोहचली आहे. रात्री बुधराणी हॉस्पिटलमध्ये स्फोटात जखमी झालेल्या अलगाझोली या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा युवक वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. सुदानवरुन तो शिक्षणासाठी पुण्यात आला होता. 13 फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता.सुरक्षाव्यवस्था वाढवलीदरम्यान पुणे बाँबस्फोटाला आज एक आठवडा पूर्ण झालाय. अजूनही हॉस्पिटल्समध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काही लोकांना अटक केल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल केला होता. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान ओशो आश्रम, छाबड हाऊस आणि जर्मन बेकरी परसरातली सुरक्षाव्यवस्था आणखी वाढवण्यात आलीय. सुरक्षेबाबत बैठकपुण्यात कौन्सिल हॉलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या संर्दभात बैठक झाली. पण या बैठकीत काय चर्चा झाली हे सांगण्यात आलेले नाही. राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे, पोलीस आयुक्त सत्यपालसिंग, विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्यासह वरिष्ठ आधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नो स्कार्फ पुण्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्कार्फ बांधून फिरु नये, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. पुरुषांना संपूर्ण शहरामध्ये स्कार्फ किंवा रुमालाने चेहरा झाकायला बंदी घालण्यात आली आहे. तर महिलांनी कोरेगाव पार्क आणि कॅन्टोनमेंट भागात फिरताना स्कार्फ, मास्क बांधू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मानवी साखळीपुणे बाँबस्फोटाला आज एक आठवडा पूर्ण होत आहे. त्यानिमीत्ताने शहरात मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारवाडया भोवती आज संध्याकाळी सगळे पुणेकर मानवी साखळी करणार आहेत. यावेळी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2010 08:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2010 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close