S M L

मोदींची पाकिस्तानला भेट धाडसी, सेनेकडून कौतुक

Sachin Salve | Updated On: Dec 28, 2015 10:23 AM IST

मोदींची पाकिस्तानला भेट धाडसी, सेनेकडून कौतुक

28 डिसेंबर : या ना त्या प्रकरणावरुन भाजपवर एकही टीकेची संधी न सोडणार्‍या शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. आजच्या 'सामना'मधून पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीचं कौतुक करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या भेटीचं धाडसी भेट असं वर्ण करण्यात आलंय. मोदी यांच्या या भेटीबाबत शिवसेनेने आधी आगपाखड केली असली तरीही आज त्यांच्या भूमिकेला सावध पाठिंबा दिल्याचं चित्र दिसतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे धाडसी आहेत. म्हणूनच ते अचानक लाहोरमध्ये घुसले (म्हणजे उतरले) आणि त्यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या या धाडसी पावलांमुळे पाकिस्तानची कोंडी झाल्याचे चित्र रंगवले जात आहे. आता मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नवाज शरीफही अचानक दिल्लीत उतरले तरी आश्चर्य वाटायला नको. मोदी हे पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी जे श्रम घेत आहेत ते कौतुकास्पद आहे अशी दाद शिवसेनेनं दिलीये.

तसंच यापूर्वी लालकृष्ण अडवाणी हे जीनांच्या कबरीवर जाऊन त्यांचे गुणगान करून आले व त्यांच्या राजकारणास उतरती कळा लागली आणि आज ते अडगळीत फेकले गेले. वाजपेयी यांनी लाहोर बस सोडण्यापासून पुढे आग्रा येथे जनरल मुशर्रफ भेटीपर्यंत श्रम घेऊन पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, पण त्यानंतर वाजपेयींच्याच नेतृत्वाखालील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही. पाकिस्तानची भूमी ही अशी शापित आहे. त्या शापित भूमीशी चुंबाचुंबी करणे महाग पडते; कारण लाखो निरपराध्यांचे रक्त त्या भूमीत झिरपले आहे बाकी आणखी काय सांगावे! राज्यकर्ते नेहमीच शहाणे असतात व सत्तेपुढे इतरांचे शहाणपण चालत नाही असा चिमटाही या लेखात काढण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2015 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close