S M L

मधुकर सरपोतदार यांचे निधन

20 फेब्रुवारीशिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपोतदार यांचे आज हार्ट अटॅकमुळे मुंबईत निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानच त्यांचे निधन झालं. काही दिवसांपूर्वी हार्टअटॅक आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.मधुकर सरपोतदार खेरवाडी विधानसभा मतदार संघातून 1990 आणि 1995 असे सलग दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते.त्यानंतर 1996 आणि 1998च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून दोनदा निवडून गेले.सरपोतदारांना 1992-93च्या भीषण जातीय दंगलीतील सहभागाबद्दल दोषी ठरवून विशेष कोर्टाने 1 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मुंबईत जातीय दंगलीच्या काळात लष्कराने घेतलेल्या झडतीत सरपोतदारांच्या गाडीत शस्त्रे सापडली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2010 11:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2010 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close