S M L

थर्टी फस्ट पार्टी करताय ?,तर परवाना घ्यायला विसरु नका !

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2015 08:49 AM IST

थर्टी फस्ट पार्टी करताय ?,तर परवाना घ्यायला विसरु नका !

 29 डिसेंबर : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी ओल्या पाटर्‌यांचं आयोजन होतं. पण अशा पाटर्‌यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी लागते, हे बर्‍याच जणांना माहितच नसतं किंवा तशी गरज त्यांना वाटत नाही.

कदाचित यामुळेच आत्तापर्यंत केवळ 45 जणांचेच अर्ज आले असून गेल्या वर्षी हा आकडा 165 इतका होता, आणखी दोन दिवसात या अर्जाचा आकडा हा 45 हून 100 पर्यंत वाढेल असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाने वर्तवला आहे.

या परवान्यासोबतच खोटी दारू तयार करून विकणार्‍यांवर आणि विनापरवाना दारूच्या पाटर्‌या आयोजित करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी 12 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत दारूच्या फेसाळत्या ग्लासाने करणार असाल तर आधी परवाना घ्यायला विसरु नका असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2015 08:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close