S M L

महापालिका कर्मचार्‍यांचा नियोजित संप मागे

20 फेब्रुवारीमुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. या कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगानुसार पगार देण्याचे आश्वासन महापौर श्रद्धा जाधव आणि आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या मुख्य मागणीसाठीच या कर्मचार्‍यांनी 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी सर्व कामगार संघटनांशी चर्चा केली. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सहाव्या वेतन आयोगानुसार या कामगारांना 300 कोटींची पगाराची थकबाकी द्यावी लागणार आहे. आत्तापर्यंत थकबाकीचे चार हप्ते दिले गेले आहेत. पाचवा हप्ता होळीच्या आधी देण्यात येणार आहे. जवळपास 1 लाख 20 हजार कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल सर्व कामगार संघटनांनी महापौर आणि आयुक्तांचे आभार मानले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2010 11:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2010 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close