S M L

मनसेचे पिंपरीत 'ब्रिटीशकालीन' आंदोलन

20 फेब्रुवारीपिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आजचा दिवस हा वेगवेगळ्या आंदोलनाचा दिवस होता. शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या करवाढीच्या विरोधात एक अनोखे आंदोलन केले. महापालिकेने ब्रिटीश काळाप्रमाणे जाचक कर लादल्याचा आरोप करत, मनसेने ब्रिटिशांच्या वेशात दोघांना घोड्यावर बसवले. आणि महापालिकेने करवाढ रद्द करावी, अशी मागणी केली. तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनीही महापालिकेच्या निर्णयांचा विरोध करत आंदोलन केले. दुसरीकडे चिंचवड गावातील स्मशानभूमीच्या जागेसाठी चिंचवडच्या गावकर्‍यांनी महापालिकेच्या आवारातच प्रतिकात्मक प्रेताचे दहन केले. त्याचप्रमाणे कोट्यवधींची थकबाकी असताना सामान्यांवर 8 टक्के करवाढ करण्याच्या विरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष सोडून सर्वच पक्षांनी आंदोलन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2010 12:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2010 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close