S M L

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2015 06:51 PM IST

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

30 डिसेंबर : आनंदयात्री जिप्सी आज अखेरचा विसावला आहे. अनेक अजरामर कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाडगावकर यांच्या पार्थिवावर शीव इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

कोणतेही धार्मिक विधी न करता पाडगावकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्याला अखेरचा श्वास आपल्या लिहीण्याच्या खोलीतच यावा अशी पाडगावकर यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांची तब्येत बिघडल्यावर या खोलीचं रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. 

प्रेम म्हणजे प्रेम असतं..., 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या त्यांच्या काव्यपंक्ती अजरामर आहेत. अगदी सहज, सोप्या भाषेतून वाचकाला जगण्याचे बळ देणारे, नवी उमेद देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांची अनेक कविता, गाणी प्रसिद्ध आहेत.

मंगेश पाडगावकर यांचा जन्म सिंधूदुर्ग जिल्यातील वेंगुर्ले या गावी 10 मार्च 1929 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि वेंगुर्ले येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि संस्कृतमधून एमएची पदवी घेतली. रुईयामध्ये त्यांनी काही काळ नवीन शिकवण्याचं काम केलं.

'साधना' साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी थोडे दिवस काम केले. त्यानंतर त्यांनी युनायटेड स्टेट्स इन्फ़ॉर्मेशनमध्ये काम केले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी पहिली कविता केली. मंगेश पाडगावकर यांचा धारानृत्य हा पहिला कवितासंग्रह 1950 मध्ये प्रसिद्ध झाला. निसर्ग आणि प्रेमभावना यांनाही त्यांच्या कवितेत प्रधान स्थान लाभले आहे.उपहासात्मक पद्धतीची कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. बालगीते हा काव्यप्रकारही त्यांनी यशस्वीरीत्या हाताळला आहे.

मीराबाईच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्यांच्या सलाम या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. कविवर्य मंगेश पाडगावकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण पुरस्कारने गौरवण्यात आलं. दोन वर्षांपूर्वी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प सन्मान पुरस्कारने सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्राला प्रेम शिकवणार महाकवी आज काळाच्या पडद्याआड गेलाय.

मंगेश पाडगावकरांच्या काही गाजलेल्या कविता

- सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?

- सलाम

- प्रेम म्हणजे प्रेम असतं

- फूल ठेवूनि गेले

- असा बेभान हा वारा

- सावर रे, सावर रे, उंच उंच झुला

- जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा

- आम्लेट

- दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड

- अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

- प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो

- नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं

- मी बोलले न काही नुसतेच पाहिले

- आतां उजाडेल !

- सांगा कसं जगायचं

- अफाट आकाश

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2015 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close