S M L

पालघरमध्ये 'ड्रोन'च्या मदतीने दारूचे अड्डे केले उद्‌ध्वस्त

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2015 01:02 PM IST

पालघरमध्ये 'ड्रोन'च्या मदतीने दारूचे अड्डे केले उद्‌ध्वस्त

31 डिसेंबर : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी गावठी दारू शोध मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्यांनी ड्रोन कॅमेरा चा वापर केला आहे. वसईतील मलाजीपाडा हा विभाग गावठी दारूसाठी ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात या परिसरात गावठी दारू बनवली जाते.

मालवणीतील गावठी दारू प्रकरणात याच विभागातून दारू पुरवठा झाल्याची माहिती मिळाली होती. वसईतील मलाजीपाडा विभागात भाईंदर खाडी इथे तीन बेटं आहेत. या बेटांवर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जाते. पोलिसांनी चार टीम तयार करून ड्रोन च्या साहाय्यानं पाहणी करून गावठी दारूच्या भट्‌ट्या फोडल्या ही कारवाई आणखी आठ दिवस अशीच चालू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2015 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close