S M L

ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये पकडल्याने तरुण संतापला, 5 बाईक दिल्या पेटवून

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2016 02:03 PM IST

ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये पकडल्याने तरुण संतापला, 5 बाईक दिल्या पेटवून

01 जानेवारी : नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत होत असताना ठाण्यात दारू पिऊन गाडी चालवणार्‍या तरुणाला पकडलं म्हणून त्यानं आपली नवी कोरी  बाईक जाळली. या आगीत आणखी 5 बाईक जळाल्या आहेत. या प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी या आरोपीला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे स्थानक परिसरात वाहतूक पोलीस दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करत होते. त्यावेळी एका तरुणाला वाहतूक पोलिसांनी पकडून त्याला दंड भरण्यास सांगितल्यावर त्याने आपली बाईक पेटवून दिली. त्याचं दुदैर्व म्हणजे या आगीत आणखी 5  बाईक जळाल्या आहेत. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आजूबाजूच्या बाईक्सना वेळेत बाजूला केल्यामुळे आणखी नुकासन टळलं.

हा पराक्रम केलेल्या युवकाच्या शरीरात 344ml. ऐवढी अल्कोहोल होती. ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

a

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2016 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close