S M L

दिघावासीयांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2016 02:04 PM IST

digha_ncp

01 जानेवारी : दिघा अनधिकृत इमारती प्रकरणी हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. 9 इमारती खाली करण्याच्या कारवाईला हायकोर्टाने 7 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे.

प्रशासन याठिकाणी आजपासून कारवाईस सुरूवात करणार होतं. कोर्टाचा हा आदेश केवळ 9 इमारतीसाठी लागू आहे. उर्वरीत 81 इमारतीवर मात्र केव्हाही हातोडा पडू शकतो. प्रशासनाच्या कारवाईमुळे तब्बल 1500 पीडीत कुटुंबांवर नववर्षाच्या तोंडावरच बेघर होण्याची वेळ येवून ठेपलेली आहे.

अनधिकृत इमारती : पुढे काय?

- आज 9 इमारती खाली करणार

- कोर्टाच्या देखरेखीखाली या इमारतींचा ताबा MIDCला जाणार

- 90 पैकी ज्या इमारती कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात आहेत, त्यावर सध्या कारवाई नाही

- 81 इमारतींवर कधीही हातोडा पडण्याची शक्यता

- विधान परिषदेच्या उपसभापतींनी आदेश देऊनही राज्य शासनानं रहिवाशांची बाजू मांडली नाही

- हातोडा चालल्यास 1500 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2016 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close