S M L

काळा पैसा परत येणार होता त्याचं काय झालं?, अण्णांचं मोदींना पत्र

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2016 06:03 PM IST

anna vs modi sarkar01 जानेवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय, भ्रष्टाचार, लोकपाल आणि लोकआयुक्ताबाबात या पत्रात प्रश्न विचारण्यात आले आहे. तसंच मोदींनी सत्तेत येण्याआधी काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांचं काय झालं असा सवालही अण्णांनी उपस्थित केला.

अण्णांचं मोदींना पत्र

"मोदी जी, माझ्या पत्राला उत्तर देऊ नका. मात्र चर्चेचं मन मोठं ठेवा. पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधातही मी आंदोलनं केली होती. पण तरीही त्यांनी चर्चेची तयारी दाखवली. वो बडे मन के लोग थे ! काळा पैसा परत येणार होता त्याचं काय झालं? तुम्ही यापूर्वी माझी सर्व पत्रं केराच्या टोपलीत टाकली आहेत. हेही तुम्ही केराच्या टोपलीतच टाकणार. पण देशहितासाठी माझी लढाई सुरूच राहील. शेतकर्‍यांच्या कृषिमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. खरं बोललो तर सख्ख्या आईलाही राग येतो. तसंच माझ्या बोलण्यानं तुम्हाला राग येत असेल. पण माझं काम मी सुरू ठेवणार आहे." - अण्णा हजारे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2016 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close