S M L

शरीफ हे 'शरीफ' नाही, पाकला आता जशास तसे उत्तर द्या : शिवसेना

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2016 10:00 PM IST

शरीफ हे 'शरीफ' नाही, पाकला आता जशास तसे उत्तर द्या : शिवसेना

02 जानेवारी : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे शरीफ नाहीत. पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करू नये. पाकिस्तानच्या कुरापती पाहता त्यांना जशास तसं उत्तर द्यायची गरज आहे अशी मागणी शिवसेनेनं केलीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत शांततेसाठी चर्चा करताय. आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून

दहशतवादी पाठवले जात आहे. एकाच वेळेस दहशतवाद आणि चर्चा होऊ शकत नाही. ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे. काश्मिर आज अस्वस्थ आहे. तिथे खुलेआम आयसिसचे झेंडे फडकावले जात आहे. आज पंजाबवर हल्ला केलाय. काश्मिर आणि पंजाबही दोन राज्य जर दहशतवाद्यांच्या मुठीत जायला लागली तर देशाची सुरक्षितता धोक्यात आहे. पाकला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. हे आमचं म्हणणं आहे. पण सरकारकडून केवळं वल्गना केली जात आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

तर पाकिस्तानाच्या भेटीवर आणि कारवायांवर शिवसेनेनं नेहमी ठाम भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी नवाज शरीफ हे शरीफ नाही असा शब्द वापरला होता तो खरा आहे. जोपर्यंत पाकच्या कुरापत्या थांबत नाही. तोपर्यंत चर्चा करूच नये. भारताने आता कठोर भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2016 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close