S M L

आवरा !, पेटत्या हाॅटेलसमोर काढला जोडप्याने सेल्फी

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2016 09:26 PM IST

आवरा !, पेटत्या हाॅटेलसमोर काढला जोडप्याने सेल्फी

02 जानेवारी : सेल्फी काढण्याची काही जणांना भारीच हौस असते. पण ही हौस किती आणि कोणत्या थराला पोहचू शकते याचं जिवंत उदाहरण दुबईत आढळून आलं. थर्टी फर्स्टला दुबईतील ऍड्रेस डाऊनटाऊन या हॉटेलला भीषण आग लागली होती. पण एका जोडप्याला या आगीशी जणू काही घेणं देणं नाही अशा थाटात मस्त पैकी एक सेल्फी काढला.

बरं हे जोडपं एवढ्यावरच थांबलं नाही, त्यांनी हा सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटो पोस्ट करताना या जोडप्याने फोटोला कॅप्शनही 'आमच्या दुबईला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. देव या देशाला आशीर्वाद देवो आणि रक्षण करो कारण या देशाने आम्हाला कायमच सर्वात मोठ्या आतशबाजीने अचंबीत केलंय.' इतक्या गंभीर प्रसंगाच्या फोटोला असं कॅप्शन दिल्यामुळे या जोडप्याला सोशल मीडियावर अनेकांनी मुर्खही ठरवलं. ट्विटरकरांनी या जोडप्याचा चांगलाच समाचार घेतला.

दुबईतील 63 मजली असलेल्या ऍड्रेस डाऊनटाऊन या आलीशान हॉटेलला नवीन वर्ष सुरू व्हायच्या तीन तासांआधीच आग लागली. खालच्या मजल्याला लागलेली आग अगदी काहीच क्षणात वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त बुर्ज खलिफा इथं आतशबाजी चालू असताच ऍड्रेस डाऊनटाऊनच्या आगीचा धूरही आकाशात दिसत होता.

परंतु इतकी मोठी आणि गंभीर घटना डोळ्यांदेखत घडत असताना या फोटोतील जोडप्याने सेल्फी काढणं पसंत केलं. यावरून स्पष्ट दिसून येतं की सेल्फीने जगातील लोकांना नुसतं वेडच लावलं नाही तर निष्ठूरही बनवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2016 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close