S M L

आणखी दोन वाघांचा दुर्दैवी मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2016 05:31 PM IST

आणखी दोन वाघांचा दुर्दैवी मृत्यू

04 जानेवारी : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या जंगलात वाघांच्या मृत्यूच्या घटना घडत आहे. वाघांचे एकापाठोपाठ एक मृत्यू होतायत आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे कुणालाही कळू शकलेलं नाही. आज आणखी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या आठवड्यातच चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावलीच्या जंगलात वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू झाला होता. वाघाच्या बछड्यांचा मृत्यू हा विषबाधेनं झाला असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशमधल्या पेंच व्याघ्रप्रकल्पालगत एका वाघाचा विहिरीत बुडुन मृत्यू झालाय. या महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरच्या विहिरीत पडून या वाघाचा मृत्यू झाला. तर नागपूरच्या बुटीबोरी

वनक्षेत्रात रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close