S M L

कोल्हापूर ते सांगली रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मिरज शेवटचा थांबा

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2016 07:43 PM IST

323rail_budget201404 जानेवारी : कोल्हापूर ते सांगली रेल्वे मार्गावर आज मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली या मार्गावरची रेल्वे वाहतूक पूर्ण पणे बंद होऊन प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे.

आज मध्यरात्रीपासून उद्या (मंगळवारी) सकाळपर्यंत हा मेगाब्लॉक आहे. हातकणंगले जवळ रेल्वे मार्गावर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. पुणे, मुंबईहून कोल्हापूरकडे येणार्‍या गाड्या या मिरजमध्येचं थांवबण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close