S M L

एकतर्फी प्रेमाचा बळी, सातवीत शिकणार्‍या मुलीची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2016 08:14 PM IST

एकतर्फी प्रेमाचा बळी, सातवीत शिकणार्‍या मुलीची आत्महत्या

04 जानेवारी : लातूरमध्ये एकतर्फी प्रेमाला कंटाळून एका सातवीत शिकणार्‍या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. वसंतनगर तांडा इथली ही घटना आहे. ममता राठोड असं या मृत मुलीचं नाव आहे. तिच्या गावात राहणारा वैजनाथ चव्हान याने तिला जबरदस्ती प्रेमपत्र पाठवून जीवे मारण्याची धमकीही दिली. या छळाला कंटाळून तिने स्वतःला पेटवून घेतलं. तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

वसंतनगर तांडा येथील सातवीत शिकणार्‍या ममता राठोड या मुलीला त्याच गावतील वैजनाथ चव्हाण हा मुलगा नेहमी छेड काढायचा.

या मुलाने ममताला प्रेमपत्र आणि ग्रीटिंग कार्ड दिलं, मात्र त्याचे कार्ड न स्वीकारता ममताने ते फेकून दिलं. त्यानंतर ममताने सगळी हकीकत आपल्या घरच्यांना सांगितली. तिच्यासोबत झालेल्या या प्रकारामुळे ती अस्वस्थ झाली होती.

त्यामुळेच तिने स्वतःला पेटवून घेतलं त्यात ती 92 टक्के जळाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिची छेड काढणार्‍या आणि तिला मानसिक त्रास देणार्‍या वैजनाथ चव्हाण मुळेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार मयत ममताच्या वडिलांनी पोलिसात केली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश मिळालं नाही. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला जेरबंद करून न्याय देण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close