S M L

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात खैरेंचा शाही विवाह सोहळा

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2016 10:51 PM IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात खैरेंचा शाही विवाह सोहळा

04 जानेवारी : मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला गेलाय. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. पण दुसरीक डे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना दुष्काळाचं गांभीर्य नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचा थाटबाट पाहता तो चर्चेचा विषय ठरलाय.

औरंगाबादेत आज सेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांची धाकटी मुलगी प्रेरणा खैरे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. प्रेरणा खैरे यांचा विवाह कर्नाटकातील धारवडच्या बसवराज आरकट्टी यांच्याशी झाला.  दुष्काळग्रस्त मराठवाड्यात हा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विशेष म्हणजे औरंगाबादेतूनच सेनेच्या नेत्यांचे दुष्काळी दौर्‍यांचं नियोजन झालं.

खास करून खासदार चंद्रकांत खैरे हेसुद्धा दुष्काळी दौर्‍यात सहभागी झाले आहे. हा लग्न सोहळा खैरे यांचा खाजगी सोहळा आहे. त्यांनी लग्नात काय करावं हा त्यांचा खाजगी विषय...मात्र एकीकडे सेनेच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना राबवल्या जाणार असल्याचं जाहीर केलं. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे स्वत:च्या पैशानं दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करीत आहेत. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा हा लग्न सोहळा चर्चेचा विषय ठरलाय. खैरे यांच्या घरातलं शेवटचं लग्न होतं.

या लग्नाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सेनेचे नेते आणि राज्य मंत्री सुभाष देसाई यांच्यासह सेनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. त्यामुळे दुष्काळग्रस्त किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला मुलींचं लग्न याचं लग्न सोहळ्यात लावले असते तर शेतकर्‍यांना मदत झाली असती अशी भावना स्थानिक व्यक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2016 10:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close