S M L

सहकारी बँकांना दिवाळखोरीत घालणार्‍या संचालकांवर निवडणूक लढण्यास 10 वर्षांची बंदी?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2016 09:23 AM IST

सहकारी बँकांना दिवाळखोरीत घालणार्‍या संचालकांवर निवडणूक लढण्यास 10 वर्षांची बंदी?

MSC ISSUE

05 जानेवारी : भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे, त्या संचालकांना पुढील दोन टप्प्यांत म्हणजेच तब्बल 10 वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी या प्रस्तावावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही काँग्रेसमधील सहकार सम्राटांना मोठा दणका बसणार आहे.

अनियमित कामकाजामुळे बँक अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना पुन्हा बँकेची निवडणूक लढवायला मज्जाव करावा, असा आग्रह रिझर्व्ह बँकेने केला होता. त्याचाच आधार घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सहकारावरील हुकूमत मोडीत काढण्याच्या हालचाली भाजप-शिवसेना युती सरकारने सुरू केल्या आहेत. आज होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिखर बँकांना दिवाळखोरीत घालणार्‍या संचालकांचं आज भवितव्य ठरणार आहे.

'या' निर्णयाचा यांना बसणार फटका?

अजित पवार

विजयसिंह मोहिते पाटील

हसन मुश्रीफ

मधुकर चव्हाण

दिलीप सोपल

माणिकराव कोकाटे

विजय वडेट्टीवार

आनंदराव अडसूळ

पांडुरंग फुंडकर

जयंत पाटील

मिनाक्षी पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2016 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close