S M L

सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला, सनातनची धमकी

Sachin Salve | Updated On: Jan 6, 2016 10:30 PM IST

सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला, सनातनची धमकी

06 जानेवारी : सनातन संस्थेने आपले भडकावण्याचे आणि धमक्या देण्याचे उद्योग सुरूच ठेवले आहे. आता सनातन संस्थेने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना धमकी दिलीय. सबनीस तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला, अशी धमकी सनातन संस्थेने दिली आहे. सनातनचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे सनातनने सबनीस यांना थेट धमकी दिलीय.

याआधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या ते मॉर्निंग वॉकला गेलेले असतानाच झाली होती. या पार्श्वभूमीवर सनातनची ही धमकी म्हणजे सबनीस यांना थेट हल्ल्याची धमकी आहे. दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सनातन उघडउघड ट्विटरवरून अशा धमक्या देतं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2016 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close