S M L

अण्णांच्या संस्थेला 'भ्रष्टाचार' भोवला, विश्वस्त मंडळ निलंबित

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2016 07:51 PM IST

anna in jantarmant07 जानेवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाला पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्ताने दणका दिलाय. अण्णांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संस्थेचं विश्वस्त मंडळ अण्णांसह निलंबित करण्यात आलंय.

भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलनालातील भ्रष्टाचार विरोधी हा शब्द वगळण्यास आयुक्तांनी आदेश दिला होता. मात्र, अजूनही त्या संदर्भात निर्णय न घेतल्यानं ही कारवाई करण्यात आलीये. भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम हे सरकारचे आहे. एखाद्या संस्थेचं नाही असा निर्णय हायकोर्टाने दिला होता. यामुळेच अण्णांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संस्थेला भ्रष्टाचार विरोधी हा शब्द वगळण्याची नोटीस देण्यात आली होती. पण, या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुढील कारवाईपर्यंत प्रशासक नेमण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, अधिकृत असं कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती अण्णा हजारे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2016 07:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close