S M L

मद्यपान करून गाडी चालवणे पडणार महागात, होईल गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2016 08:46 PM IST

मद्यपान करून गाडी चालवणे पडणार महागात, होईल गुन्हा दाखल

07 जानेवारी : जर तुम्ही मद्यपान केलं असेल आणि तुम्हाला शुद्धीवर आल्यावर जरी गाडी चालवण्याचा मोह झाला तर तो तुम्हाला महागात पडेल. कारण, सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना वाहन चालकाच्या रक्तामध्ये किंचित जरी अल्कोहोल आढळले, तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहे. रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 30 मिली ग्रॅमपेक्षा जास्त आढळले. तरच गुन्हा दाखल करण्याचा यापूर्वीचा नियम रद्द करण्यात यावा, त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती केली जावी, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मि.ग्रॅ. किंवा त्यापेक्षा जास्त असल्यासच मद्यपीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा आतापर्यंत नियम आहे. मात्र, मद्यपान करून वाहन चालविण्याचे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा विनाकारण मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे याबाबत 'झिरो' टॉलरन्सची भूमिका घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या पीठानं हा निकाल दिला. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा निकाल दिला. महाराष्ट्रात दारूबंदी कायदा 1949 पासून अस्तित्वात आहे. या तसंच मोटार वाहन कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा आहे. मात्र आतापर्यंत मद्यपी वाहनचालकाच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मि.ग्रॅ. किंवा त्यापेक्षा जास्त असल्यासच त्याला शिक्षा होऊ शकत होती. आता हे प्रमाण 30 मि.ग्रॅ पेक्षा कमी असेल, तरीही मद्यपी वाहनचालकाला शिक्षा केली जाऊ शकते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2016 08:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close