S M L

मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; 150 लोकल रद्द

Samruddha Bhambure | Updated On: Jan 8, 2016 09:34 AM IST

मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; 150 लोकल रद्द

08 जानेवारी : मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच 10 जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासननं एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा हा ब्लॉक रविवार, सायंकाळी 6.30 वाजता संपुष्टात येईल.

ब्लॉक काळात मध्य रेल्वेची मेन लाइनची वाहतूक भायखळ्यापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तसंच या कामामुळे जवळपास 150 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच शुक्रवार ते रविवार म्हणजेच 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या 42 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार असला तरी, हार्बर आणि ट्रान्सहार्बरची सेवा सुरळीत सुरू असेल.

या ब्लॉकदरम्यान, शनिवार-रविवार मध्यरात्री 12.20 ते रविवार सायं. 6. 30 वाजेपर्यंत सीएसटी ते भायखळा रेल्वे वाहतूक बंद. मुंबईकडे येणार्‍या लोकल भायखळ्याहूनच परत जातील, त्यामुळे सँडहर्स्ट रोड, मस्जिद आणि सीएसटी स्थानकांत जाता येणार नाही. भायखळ्याला उतरून टॅक्सी किंवा बसनं पुढे जावं लागेल. तसंच, शनिवारी सीएसटीहून रात्री 12.10 वाजता कसारासाठी शेवटची लोकल सुटेल, तर सीएसटीहून रात्री 12.30 वाजता शेवटची कर्जत लोकल भायखळातून सुटेल. पहाटे 4.12 वाजल्यापासून रेल्वे वाहतूक भायखळा, दादर, कुर्लातून सुरू होतील.

ब्रिटीशांनी 1879 साली हँकॉक ब्रिज बांधला. या ब्रिजचा अडथळा येत असल्याने लोकलच्या वेगावर मर्यादा येत होती. तसेच ब्रिजची उंचीही कमी असल्यानं ट्रॅकची ऊंचीही वाढवता येत नव्हती. त्यामुळं या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते. हा ब्रिज तोडल्या नंतर त्या ठिकाणी मुंबई महापालिका नविन ब्रिज बांधणार आहे.

मुंबईत रविवारी जम्बो ब्लॉक

- रविवारी पहाटे 12:20 वा. सुरू होणार

- रविवारी संध्याकाळी 6:20 वा. संपणार

- भायखळ्याच्या पुढे लोकल जाणार नाहीत

- लोकलच्या 150 फेर्‍या रद्द

- लोकलच्या 476 फेर्‍या भायखळ्याला संपणार

- 42 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

- हार्बर लाईनवर सुरू राहणार

- हँकॉक पूल पाडण्यासाठी जम्बो ब्लॉक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2016 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close