S M L

सबनीसांच्या अडचणीत वाढ, आंबेडकरांविरोधात लिखाणामुळे खटले सुरू

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2016 04:00 PM IST

shripal_sabanisगोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

08 जानेवारी : पिंपरी चिंचवड येथे होणार्‍या 89 व्या साहित्य संमेलनाला आता काहीच दिवस उरले आहेत, मात्र संमेलन जसं जवळ येत आहे,तसे नवे वाद समोर येऊ लागले आहे. संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोठा वाद ओढून घेतला होता आणि आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण सबनीस यांनी आपल्या एका पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी लिखाण केल्याची आणि त्यांच्यावर न्यायलयीन खटले सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

श्रीपाल सबनीस 89 व्या अखिल भारतीय सम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि वादग्रस्त साहित्यिक,संमेलन अध्यक्षपदी निवडून आल्या नंतर फारसे चर्चेत न आलेले सबनीस, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून आता मात्र अनेकांच्या चर्चेचा विषय आणि भाजप कार्यकर्त्यांचे टार्गेट बनले आहेत. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेच उत्तर देतांना भाजप कार्यकर्त्यांनी सबनीसांचा पुतळा दहन करत त्यांना धमकी वजा इशारा दिला होता मात्र आता तेवढ़यावरच न थांबता मोदी समर्थकांनी सबनीसांचा आणखी एक कारनामा उघड केला आहे. आपला बाणा रोख ठोक असल्याचं सांगणारे सबनीस तद्न खोट बोलणारे,वाचाळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याचा आरोप करत ,भाजप खासदार अमर साबळे यांनी सबनीसांना थेट आव्हान दिलं आहे.

2014 मध्ये श्रीपाल सबनीस यांनी लिहलेल्या सेक्युलर वांगमयी-अनुबंध या पुस्तकात डॉ. बाबासाहेब यांच्या धर्मांतराबाबत गंभीर आक्षेप घेत बाबासाहेबांच्या विचार आणि कृतित विसंगती असल्याने दलित चळवळी खंडीत झाल्याचं धक्कादायक लिखाण केलंय. ज्यामुळे प्रकाशकानी पुस्तक मागे घेतलं होतं.

हे सर्व खटले आणि पुस्तकात केलेल वादग्रस्त लिखाण,आपणच केल्याचं सबनीस यांनी मान्य केलंय आणि अनेक आरोपही फेटाळले.

मात्र या बाबत खुलासा देण्याऐवजी हे सर्व वाद आताच का काढले जातायत हे सांगत,आपल्या सवयी प्रमाणे सबनीस यांनी प्रतिआरोप करायला सुरुवात केली आणि आपला हेकेखोरपणा कायम ठेवला.

साबळे आणि सबनीस यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप -प्रत्यारोपामुळे हा'साहित्य शिमगा"चांगलाच रंगेल यात शंका नाही.

सबनीस यांच्या विरोधात सुरू आहे हे न्यायालयीन खटले

1-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुस्तक चोरी प्रकरण केस क्र .76/02/06/उच्च न्यायालयात खटला प्रलंबित

2- महापुरुषांची बदनामी केस क्र. 545/2012 जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल

3- महापुरुषांची बदनामी केस क्र. 8430/2012औरंगाबाद उच्च्य न्यायालयात खटला प्रलंबित

4-महापुरुषांची बदनामी केस क्र. 383/2013 जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात खटला प्रलंबित

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2016 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close