S M L

गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर देऊ, नितेश राणेंचा सबनीसांना पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2016 04:40 PM IST

गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर देऊ, नितेश राणेंचा सबनीसांना पाठिंबा

08 जानेवारी : विचारांची लढाई, विचारानेच लढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे जर कुणी गोळ्यांची भाषा करणार असेल. तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी असल्याचा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिला.

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीसांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सनातन संस्थेवर टीकास्त्र सोडले. मॉर्निंग वॉकला जात चला अशी उघड धमकी सबनीसांना दिली जाते. अशा संस्थांना भिती कुणाची आहे तरी का ?, राज्य सरकारचा अशा संस्थांवर वचकच राहिलेला नाहीये. त्यामुळे अशा धमक्या दिल्या जात आहे. राज्य सरकार जर अपयशी ठरत असेल आणि अशी लोकं जर गोळ्यांची धमकी देत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर देऊ असा इशारा राणेंनी दिला. सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी सबनीस मार्निंग वॉकला जात चला असं ट्विट करत उघडपणे धमकीच दिली होती. त्यामुळे नितेश राणेंनी सबनीस यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2016 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close