S M L

...तर सनातन संस्था शिल्लक राहणार नाही -राणेंचा घणाघात

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2016 06:25 PM IST

...तर सनातन संस्था शिल्लक राहणार नाही -राणेंचा घणाघात

08 जानेवारी : साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि सनातनच्या वादात नितेश राणे यांच्यापाठोपाठ त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही उडी घेतलीये. सनातन हे भाजप सरकार आणि संघाचं पिल्लू आहे. सनातनला पैसा भाजपच पुरवतो असा आरोप नारायण राणे यांनी केला. तसंच सनातनने धमक्या देणं बंद करावं नाहीतर लोकं हातात कायदा घेतील तर सनातन संस्था शिल्लक राहणार नाही असा इशाराही राणेंनी दिला.

श्रीपाल सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला अशी उघड धमकी सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांनी दिली होती. त्यांच्या या धमकीचे तीव्र पडसाद उमटले. स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी सबनीसांची भेट घेऊन पाठिंबा दिला. गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर देऊ असा इशारा नितेश राणेंनी यावेळी दिला. नितेश राणे यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील नारायण राणेंनीही सनातनला धारेवर धरलं.

सनातन हे भाजप सरकार आणि संघाचं पिल्लू आहे. सनातनला पैसा भाजपच पुरवतो. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाही ?, कारण सनातन सारख्या या संस्थेला राज्य सरकाराचं अभय आहे असा आरोप नारायण राणेंनी केला.

तसंच आता तर सनातनकडून जाहीरपणे धमक्या दिल्या जात आहे. उद्या जर असंच चालू राहिलं तर लोक कायदा हातात घेतील आणि सनातन संस्था जागेवर राहणार नाही. लोकांना मार्निंग वॉकच्या धमक्या देतात, मग तुम्ही नाही चालणार का रस्त्यावरुन ? असा इशाराही राणेंनी दिला. नारायण राणेंनी सनातन संस्थेवर टीका तर केलीच पण श्रीपास सबनीसांनाही सल्ला दिला. श्रीपाल सबनीस यांनीही साहित्य संमेलनापुरतं मर्यादित राहावं. उगाच राजकारण करू नये असा सल्लाच राणेंनी दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2016 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close