S M L

जलयुक्त शिवार योजनेसाठी दिलेले 32 चेक बाऊन्स

Samruddha Bhambure | Updated On: Jan 9, 2016 08:20 PM IST

जलयुक्त शिवार योजनेसाठी दिलेले 32 चेक बाऊन्स

09 जानेवारी : जलयुक्त शिवार योजनेसाठी दिलेले चेक ही निव्वळ चमकोगिरी होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 32 चेक बाऊन्स झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील अनेक चेकवर भाजप नेत्यांची नावं आहेत. दरम्यान, हे चेक बाऊन्स होत असतील तर त्यांच्यावर कलम 138 नुसार कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

जलयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी आहे. या योजनेसाठी अतिरिक्त पैसा उभा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी मदतीचे धनादेश दिले. परंतु काही जणांनी फक्त चमकोगिरी करण्यासाठी मदतीचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. प्रत्यक्षात त्यांच्या अकाऊंटवर पैसे नसल्याने ते धनादेश वठले नाहीत. यामध्ये अनेक कंपन्याची नावे आहेत, तर उद्योगपती मोहित कंबोजसह काही भाजप नेत्यांचाही यात समावेश आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2016 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close